अमोल बालवडकर स्वार्थी; पहिल्याच टर्मला विधानसभेचे डोहाळे लागले – भाजपाच्या शिवम बालवडकरांची जोरदार टीका

मी देखील इच्छुक होतो मी देखील प्रभागात अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात काम केले आहे तरीही माझी उमेदवारी रद्द केली मात्र माझे धोरण राष्ट्र प्रथम नंतर आपण हेच होते

कोथरूड प्रतिनिधी -(Pune News ) गुन्हेगारांना परदेशात पळून जाण्यास मदत करणाऱ्या गुन्हेगारांचा “आका” बाजूला घेऊन बसणारे आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडून आलेले पुणे शहराचे खासदार आमचे नेते अजित दादा पवार यांना राजकारण शिकवण्याची भाषा करत असतील, तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिला आहे.

याच टीकेला प्रत्युत्तर देत भारतीय जनता पार्टीचे युवक संपर्कप्रमुख शिवम बालवडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अमोल बालवडकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

ते म्हणाले की; ‘गरज सरो वैद्य मरो’ ही भूमिका अमोल बालवडकर यांनीच या भागात सुरू केली, 2017 च्या महापालिकेच्या विजयानंतर लगेच आमदारकीचे डोहाळे पडले नेहमीच तीन-चार वर्षांपासून पक्षविरोधी भूमिका घेतल्या थेट उद्धव ठाकरेंना भेटले या गोष्टी तुम्ही जनतेसमोर आणणार आहात का असा सवाल देखील शिवम बालवडकर यांनी उपस्थित केला.

2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मदतीनेच भारतीय जनता पक्षातून उमेदवारी मिळवली व बाबुराव चांदेरे यांना सेटिंग करून विजयी केले भाजपाचे उमेदवार राहुल कोकाटे यांना पराजित करण्याचे काम याच महाशयांनी केले हे देखील विसरता येणार नाही.

आमच्या नेतृत्वावर टीका करा तर जशास तसे उत्तर मिळेल असा सुद्धा सजल इशारा त्यांनी यावेळी दिला आहे आमच्या देखील उमेदवारी रद्द झाले आहेत पक्षाने आम्हाला थांबा म्हणून सांगितले निश्चित आम्ही नाराज आहोत मात्र राष्ट्र प्रथम नंतर आपण हीच भूमिका आम्ही ठेवली आहे असे देखील शिवम बालवडकर म्हणाले.

फेसबुक वर पोस्ट करत शिवम बालवडकर यांनी अमोल बालवडकर यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.