भाजपाला मत न दिल्यास; लाडकी बहीण योजना बंद होणार – भाजप नेत्यांकडून ब्लॅकमेल भाजपाला मत न दिल्यास; लाडकी बहीण योजना बंद होणार –

आम्हाला निवडून दिले नाही तर लाडकी बहिणीचा १५०० रूपयांचा निधी बंद होईल, असे म्हणत भाजपकडून मतदारांना ब्लॅकमेलिंग केले जात आहे, असा आरोप भाजपचे माजी महानगराध्यक्ष अशोक ओळंबे यांनी केला आहे.

अकोल्यात भाजपच्या माजी नगरसेवकांकडून ‘मत न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद पडेल’ असा प्रचार पसरवला जात आहे, असा आरोप अशोक ओळंबे यांनी केला. ते अकोल्यात भाजपच्या बंडखोरांच्या सहविचार सभेत बोलत होते. या सहविचारसभेत भाजपचे 7 माजी नगरसेवक आणि भाजपचे नाराज असलेले पदाधिकारी उपस्थित होते.. दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा आणि अकोला महापालिकेचा काहीही संबंध नाहीये.. त्यामुळे ‘आम्हाला निवडून नाही दिल्यास तुमचा लाडकी बहिणीचा निधी बंद होईल, असं मतदारांना ब्लॅकमेलिंग सुरु असल्याचे ओळंबे म्हणाले.

500 कोटींच्या विकास निधीवरून त्यांनी भाजपवर ताशेरे ओढले. महापालिकेच्या वाढीव भागासाठी आलेला पाचशे कोटीचा निधी जंगल भागात वळवल्याचा आरोप त्यांनी केलाय. ज्या ठिकाणी कुणीही राहत नाही, तिथे लेआऊट पडले आहे, ते धनाड्य आणि जनप्रतिनिचे असून तिथेच भूमिकत गटार योजनेच्या काम या निधीतून सुरू असल्याचा आरोपही ओळंबे यांनी केलाय.