माणमधील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागणार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका; लवकरच प्रश्न सोडवणार थोपटेंना शब्द

हिंजवडी प्रतिनिधी -: माण हिंजवडी परिसरातील शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावरील औद्योगिक करणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीवर चुकीच्या नोंदी लागल्या तसेच कासारसाई धरणग्रस्तांच्या पुनर्वसनातील त्रुटी अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत याच पार्श्वभूमीवर माजी आमदार संग्रामदादा थोपटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवेदन दिले, याप्रसंगी मुळशी पंचायत समितीचे सभापती पांडुरंग ओझरकर, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव बुचडे पाटील, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अमित कंधारे, संतोष मोहिते, संदीप साठे, मल्हारी बोडके पांडुरंग राक्षे हिरामण परदेशी राहुल जांभुळकर, नितीन पारखे, निलेश भोईर, सोपान जांभुळकर, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका; लवकरच प्रश्न सोडवणार थोपटेंना शब्द

हिंजवडी-माण आयटी नगरीत रस्त्यांच्या कामासाठी काही शेतकऱ्यांची संपादित झाली. त्या शेतकऱ्यांनी योग्य मोबदला आणि न्याय मिळावा,

या बाबतची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. त्यावेळी बाधित शेतकऱ्यांनी माण व हिंजवडीतील कालवा रस्त्यावरील फेरफार आणि बदल यासंदर्भातही तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांची जमीन घेतली जाते, परंतु कोणताही मोबदला दिला जात नाही. आमच्या जमिनीवर विकासकामे केली जात आहेत, पण आम्हालाच दुर्लक्षित केले जात आहे,’’

दरम्यान, या मोबदला आणि न्यायासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. त्यावर ‘‘यापूर्वी ज्यांना मार्किंगनुसार मोबदला देण्यात आला आहे, त्यापलीकडे नव्याने कोणालाही मोबदला देणे शक्य नाही’’ अशी भूमिका प्रशासनाने मांडली. तसेच त्या वेळी मोबदला मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना पाचपट मोबदला देण्यात येईल” असे प्रशासनाने सांगितले. मात्र, या भूमिकेवर शेतकरी समाधानी नसून, त्यांना अजूनही अन्याय झाल्याची भावना आहे.

सातबारा उताऱ्यांवरील शिक्के हटवा
माण परिसरातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर असलेल्या एमआयडीसीच्या शिक्क्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. आयटी पार्कच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी माणमधील हजारो एकर शेतजमिनीवर अनेक वर्षांपासून एमआयडीसीचे शिक्के आहेत. त्यामुळे त्या जमिनींचा विकास शेतकऱ्यांना करता येत नाही. ते शिक्के हटविण्याची अनेक वर्षांची शेतकऱ्यांची मागणी दुर्लक्षित आहे, याच भूमिकेला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देत लवकरच चांगला निर्णय घेऊ असे आश्वासित केले.