सरकारचा निर्णय! जमिनीच्या मोजणीचा खर्च थेट २०० रुपयांवरसरकारचा निर्णय!

Pune update News राज्यातील शेतकऱ्यांना आणि जमिनीच्या मालकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता एकत्रित कुटुंबातील धारण जमिनींच्या पोटहिस्सा मोजणीसाठी केवळ २०० रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. (Pot Hissa Mojani Fees)

७ नोव्हेंबर २०२५ पासून हा निर्णय राज्यातील सर्व भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये लागू करण्यात आला असून, ‘ई-मोजणी वर्जन २.०’ प्रणालीतून ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या निर्णयामुळे जमिनीच्या वाटप प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती येणार आहे.(Pot Hissa Mojani Fees)

काय आहे नवा निर्णय?

शासनाने ‘नोंदणीकृत वाटणीपत्राच्या आधारे एकत्र कुटुंबातील धारण जमिनीचे विभाजन’ या प्रक्रियेसाठी दर निश्चित करण्यास औपचारिक मान्यता दिली आहे. यानुसार, प्रत्येक पोटहिस्स्यामागे फक्त २०० रुपयांचे शुल्क आकारले जाईल.

यापूर्वी या प्रक्रियेसाठी कोणतेही एकसमान शुल्क निश्चित नसल्याने जिल्हानिहाय गोंधळ निर्माण होत होता. नव्या आदेशामुळे आता राज्यभर समान शुल्क आकारले जाईल आणि नागरिकांना पारदर्शक सेवा मिळेल.

Ancestral Land Shares just 200 Rupees )

हा नवीन निर्णय राज्यभर लागू झाला असून संबंधित सर्व जिल्ह्यांच्या भूमी अभिलेख विभागाला याची माहिती देण्यात आली आहे. आता कुणी पोटहिस्सा मोजणीसाठी अर्ज केला, तर त्याला केवळ 200 रुपये भरावे लागतील. महाभूअभिलेखच्या वेबसाइटवरही हे नवीन दर अपडेट झाले आहेत. त्यात ‘एकत्र कुटुंब पोटहिस्सा मोजणी’ हा नवीन पर्यायही जोडला आहे.

ई-मोजणी व्हर्जन 2.0 या संगणक प्रणालीमध्येही बदल करण्यात आले असून, संपूर्ण प्रक्रिया आता आधीपेक्षा पारदर्शक आणि सोपी होणार आहे. कुटुंबात जमिनीच्या वाटणीवरून कायम वाद होतातच, शिवाय मोजणीच्या खर्चामुळे आणखी त्रास वाढायचा. पण या निर्णयामुळे कुटुंबातील सदस्यांवर आर्थिक बोजा पडणार नाही.

जमाबंद आयुक्त आणि भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांनी यासंदर्भात अधिकृत पत्र जारी केले आहे. यापूर्वी मोजणी दोन प्रकारे होत होती-साधी आणि जलद. जलद मोजणीसाठी तर जास्तच शुल्क लागत होतं. पण आता हा संपूर्ण खर्च मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला असून शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे.