Pune News राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने २०१७ मध्ये दीड लाखांची तर २०१९ मध्ये दोन लाखांची कर्जमाफी देण्यात आली. रकमेच्या मर्यादेत कर्जमाफी दिल्याने अनेक शेतकरी त्या योजनांचा लाभ घेऊ शकले नाहीत.
३० जूनपूर्वी मिळेल शेतकऱ्यांना कर्जमाफी
राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार असून सहकार खात्यामार्फत जिल्हानिहाय माहिती मागविली आहे. प्रविणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सरकारला सादर होईल. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकार ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे.
– दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री
