Pune महाराष्ट्र शासनाने नवीन शिक्षक नियुक्त करण्यापूर्वी टीईटी परीक्षा (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण असणे अनिवार्य केले आहे. या परीक्षेच्या उमेदवारांकडून मूळ कागदपत्रे व काही रक्कम घेवून परीक्षेपूर्वी पेपर मिळवून देतो, असे सांगणारी टोळी कागल व राधानगरी तालुक्यात कार्यरत होती.
टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वीच पेपर फोडणाऱ्या टोळीचा रविवारी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी चार शिक्षकांसह नऊ जणांना अटक करण्यात आली असून, तितकेच लोक ताब्यात घेतले आहेत.
याप्रकरणी गुरुनाथ गणपती चौगले (रा. सोन्याची शिरोली, ता. राधानगरी ), किरण साताप्पा बरकाळे, (रा.देंगेवाडी,ता. राधानगरी ), अभिजित विष्णू पाटील (रा. बोरवडे ता. कागल ), रोहित पांडुरंग सावंत (रा. कासारपुतळे ता. राधानगरी) या चार शिक्षकांसह नागेश दिलीप शेंडगे (रा. सावर्डे पाटणकर, ता. राधानगरी ), राहुल अनिल पाटील ( शिंदेवाडी ता. गडहिंग्लज), दयानंद भैरू साळवी (तमनाकवाडा, ता. कागल ), दत्तात्रय आनंदा चव्हाण (कासारपुतळे, ता. राधानगरी), अक्षय नामदेव कुंभार (सोनगे, ता. कागल ) या संशयितांना अटक करण्यात आली आहे. अन्य नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
