पिंपरी चिंचवड भाजपाची निवडणूक मोहीम वेगात; उद्या अनेक दिग्गजांचे प्रवेश होणार

चिंचवड प्रतिनिधी -: बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या जोरावर भाजपने आता पिंपरी चिंचवड महापालिकेतही ‘भव्य विजय’ मिळवण्याची तयारी सुरू केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम सुरू असताना भाजपने महापालिकेवर विजय मिळवण्याचा मोठा संकल्प केला आहे. सर्व्हेत मिळालेल्या ‘शंभर पार’ या अंदाजामुळे या तयारीला वेग आला आहे.

उद्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मेळावा आयोजित केला आहे, या मेळाव्याला पिंपरी चिंचवड शहर आयोजित ’भव्य कार्यकर्ता’ मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे या दोघांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आ.महेश लांडगे, आ.शंकर जगताप, आ.उमा खापरे, आ.अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार श्रीमती अश्विनी जगताप व पक्षाचे सर्व सन्मानीय नेते उपस्थित राहणार आहेत.आजी-माजी नगरसेवक व सर्व इच्छुक उमेदवार यांनी आपल्या व्यक्तिगत कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शहराध्य़क्ष शत्रृघ्न काटे यांनी केले आहे.

उद्या (शनिवारी) सकाळी १० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला असून अनेक रथीमहरथींचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. या निमित्ताने जबरदस्त शक्तीप्रदर्शन कऱण्याचे नियोजन भाजपने केले आहे.