Pune news पुण्यातील मुळा नदीवरील बाबा भिडे पूल सातत्याने चर्चेत असतो. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यामुळे हा पूल पुल चर्चे आला आहे. पवारांनी आज शहराती पुलांची पाहणी केली, त्यावेळी अचानक बाबा भिडे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे ? का असा प्रश्न केला. त्यावेळी अचानक विचारल्याने मेट्रोच्या अधिकाऱ्यांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडल्याचे पाहायला मिळाले.
अजित पवारांच्या प्रश्नावर कोणतेही उत्तर न देता अधिकारी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले, त्यामुळे पवार यांनी अधिकचे प्रश्न विचारणे टाळले. दरम्यान, यापूलाचे महापालिोच्या प्रकल्प विभागाने शहरातील ९८ लहान मोठ्या पुलांची पाहणी करून पाच वर्षात बांधलेले व पाच वर्षापत ऑडीट करून दुरुस्त केलेले पुल सोडून ६८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट केले आहे. यामध्ये बाबा भुडे पूलाचेही स्ट्रक्चरल ऑडीट झाले आहे. पुलाची किरकोळ दुरुस्ती असून ती लवकरच केली जाणार आहे. पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दीनकर गोजारे यांनी सांगितले.
अजित पवार यांनी मेट्रो, महापालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या समवेत बुधवारी सकाळी सात वाजता मेट्रो प्रशासनाकडून मोठ्या नदीवर उभारण्यात आलेल्या तानपुरा ब्रिजची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांकडून त्यांना बाबा भिडे पुलावर मेट्रोकडून उभारण्यात येत असलेल्या पादचारी पुलाची माहिती देण्यात येत होती. अधिकारी नियोजित पुलाचे तैलचित्र व ड्रॉइंग दाखवत असताना अचानकपणे पवार यांनी बाबा भिडे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला. अजित पवार यांनी विषयांतर करून अचानक हा प्रश्न विचारल्याने अधिकारी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. यावेळी उपस्थित असणारे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनाही याबद्दल काही माहिती नव्हते. अधिकारी अधिकाऱ्यांची चलबिचल पाहून अजित पवार यांनीही या विषयावर अधिकचे प्रश्न टाळून पादचारी पुलाचे काम कधी पूर्ण होणार आहे ? अशी विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्यांनी हे काम तीन महिन्यात पूर्ण होईल, असे सांगितले.
त्यावर अजित पवार म्हणाले, या पुलाचे काम झाल्यानंतर भिडे पूल आपण काढून टाकू. त्यावर उपस्थित असलेले पोलिस अधिकारी मनोज पाटील यांनी भिडे पुल हा डेक्कन व शनिवार पेठ परिसरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो. हा पुल पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर व आता पादचारी पुलाच्या कामासाठी बंद ठेवला जातो. पूल बंद केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) व डेक्कन परिसरातील मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे भिडे पूल वाहतुकीसाठी फायद्याचा असल्याचे सांगितले. दरम्यान, अजित पवाप यांनी तानपूरा ब्रीजची पाहणी करताना, कामातील अनेक त्रुटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत, त्या तातडीने दूर करण्यासोबतच दिवाळी झाल्याबरोबर नदी पात्रातील फटाका स्टॉल व त्याचे साहित्य हटवून रस्ता मोकळा करण्याचा सूचना केल्या.
दरम्यान, अजित पवार सकाळी सात वाजताच ब्रीजची पाहणी करण्यासाठी आल्याने जोगोजागी त्यांना सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांनी प्रश्न सोडवण्याची विनंती केली. परिसरामध्ये लहान मुलांसाठी उद्यान नाही किंवा लहान मुलांसाठी दर्जेदार खळाचे साहित्य नाही. त्यामुळे बालोद्यानाचा प्रश्न मार्गी लावा तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या आहे, या समस्या सोडवण्याची विनंती केली.
