Maharashtra politics : राज ठाकरेंच्‍या माताेश्रीवरील बैठकीत युतीबाबत काय ठरलं?

Pune Uddhav Thackeray meeting : महानगरपालिका निवडणुका काही आठवड्यांवर येवून ठेपल्‍या आहेत.शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची युती लवकरच जाहीर होणार, अशा चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले असतानाच रविवारी (दि.५) राज ठाकरे यांनी मातोश्रीला भेट दिली.

मात्र ही भेट राजकीय होती की कौटुंबिक यावर खल सुरु होता. या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली याचे उत्तर आज (दि. ६) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्‍यमांशी बोलताना दिले.

उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्‍यात राजकीय चर्चा

राज ठाकरे यांच्‍या मातोश्रीवरील भेटीबाबत बोलताना संजय राऊत म्‍हणाले की, रविवारी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्‍यात अर्धा तास राजकीय चर्चा झाली. मनसे महाविकास आघाडीमध्‍ये सहभागी होणार का, या प्रश्‍नावर बोलताना राऊत म्‍हणाले की, “महाविकास आघाडीमध्‍ये तीन प्रमुख पक्ष आहेत. तसेच मनसे हाही एक राज्‍यातील प्रमुख पक्ष आहे. त्‍यामुळे याबाबत मी अधिकृतपणे कोणतेही भाष्‍य करु शकत नाही.