खडकवासला प्रतिनिधी – : श्रावण मास समाप्तीनिमित्त अहिरे म्होकरवाडी ता. हवेली या ठिकाणी सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व शिवसेना खडकवासला मतदार संघांचे संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यामध्ये डॉ. संतोष कवले, सोनाली दीक्षित यांनी नागरिकांची रक्तदाब, रक्त आणि शुगर तपासणी केली. सपना शिंदे, जोत्स्ना मॅडम, शुभमिता मॅडम आणि आकाश यांनी इसीजी काढला. तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुलांची रक्तगट तपासणी करण्यात आली आणि त्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
शिबिराचे उदघाटन ग्रामपंचायत सदस्य माऊली म्होकर आणि अश्विनी गायकवाड यांचे शुभहस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा समन्वयक रवी मुजुमले, विधानसभा प्रमुख नितीन वाघ, जिल्हा संघटक सचिन पासलकर, विधानसभा संघटक बुवा खाटपे, तालुका समन्वयक अरुण घोगरे,विभागप्रमुख पप्पू गायकवाड, दिपक खिरीड, तालुका संघटक भरत गोगावले, राजेंद्र नवघणे, राजाभाऊ वांजळे, महेश बाळगे, सुनिलभाऊ म्होकर, मालोजी भोसले, तानाजी म्होकर, माऊली वांजळे, पूनम वांजळे, शाळेचे शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिराचे आयोजन उपतालुका प्रमुख रामदास गायकवाड, पप्पू अण्णा गायकवाड यांनी केले व नियोजन सागर शिर्के, शिवाजी वांजळे, सागर म्होकर, चेतन नालगुडे यांनी केले.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समन्वयकांची मुंबई बैठक पार पडली
