धायरी (Dhayari Pune news ) उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोखठोक बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात, अनेकवेळा अजित पवार भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना सुनावताना दिसतात, भल्या पहाटेच ते फिल्डवर असतात कामाचा आढावा घेतातधायरी परिसरातील नागरिकांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या डीपी रोडच्या कामाबाबत ठाम भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, धायरीचा डीपी रोड केवळ आश्वासनांत न राहता तातडीने पूर्ण व्हावा.
यासाठी होर्डींग्ज झळकावून ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की, ‘दादा एक पहाटेचा दौरा धायरीच्या डीपी रोडला पण होऊन जाऊ द्या कीधायरी (Dhayari Pune news ) उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोखठोक बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात, अनेकवेळा अजित पवार भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना सुनावताना दिसतात, भल्या पहाटेच ते फिल्डवर असतात कामाचा आढावा घेतात
याच पार्श्वभूमीवर धायरी परिसरातील नागरिकांनी अजित पवारांना खास पुणेरी शैलीत विनंती केली आहे. धायरीच्या डीपी रोडच्या कामाबाबत लावण्यात आलेल्या बॅनरने पुणेकरांचे लक्ष वेधले आहे.
धायरी परिसरातील डीपी रोडचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने “दादा, एक पहाटेचा दौरा धायरीच्या डीपी रोडला पण होऊन जाऊ द्या. दादा, तुम्ही आल्यानंतरच धायरीचा डीपी रोड पूर्ण होणार आहे,” असा आशय असलेले बॅनर धायरीत लावण्यात आले आहे. हा फलक पाहून नागरिक मिश्कील प्रतिक्रिया देत आहेत. खास पुणेरी टोला देत धायरकरांनी अजितदादांना चिमटा काढला आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढला तोडगा
दरम्यान, धायरी परिसरात वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या रस्त्यांमुळे डीपी रोडचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. धायरी गावाचा डीपी रोड पूर्ण न झाल्यास ग्रामस्थ शांत बसणार नाहीत, असा इशारा धायरी गाव डीपी रोड वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने देण्यात आला आहे.
