चाकण प्रतिनिधी :- स्वातंत्र्यदिन हा सर्वात मोठा राष्ट्रीय सण आहे, आज देशभरात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, खेड उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड राजगुरुनगर येथील कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार कार्यालयात मोठ्या उत्साहात ध्वजारोहण समारंभ पार पडला,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सर्व कर्मचारी संचालक, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन करून देशभक्तीची गगनभेदी घोषणांनी वातावरण भारावून टाकले.
या स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानाची आठवण करून देत, नागरिकांना एकतेचा आणि विकासाचा संदेश देण्यात आला.
यावेळी सभापती विजय शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, उपस्थितांचे आभार मानले
