Pune आंदेकर टोळीचा म्होरक्या कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांवर न्यायालयाच्या आवारात हल्ला करणाच्या प्रयत्न करण्यात आला होता मात्र, पोलिसांनी हा हल्ला नकामी केली.
त्यानंतर कारागृहात घेऊन जात असताना त्यांच्या गाडीचा पाठलाग केला गेला पण पोलिसांनी सतर्कतेमुळे हा हल्ला देखील परतवून लावण्यात आला. अशातच आता हा हल्ला करणाऱ्या गायकवाड टोळीतील म्होरक्या सुरज ठोंबरेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
गायकवाड टोळीची सूत्र सुरज ठोंबरेकडे
नाना पेठेतील बंडू आंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी सूरज ठोंबरे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. सूरज ठोंबरे हा सोमनाथ गायकवाडचा जवळचा साथीदार असून गायकवाड सध्या कारागृहात आहे. गायकवाड टोळीची सूत्र ठोंबरे सांभाळत होता. कृष्णा आंदेकरला न्यायालयातून नेत असताना त्याच्यावर हल्ला करण्याचा कट ठोंबरेने रचला होता.
पुण्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी कडक पाऊलं
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुण्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी कडक पाऊलं उचलली असून भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोंबरेविरुद्ध मकोका कारवाईचा प्रस्ताव तयार केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे आणि पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ठोंबरे टोळीविरुद्ध मकोका कारवाईचे आदेश दिले आहेत.
शोएब कुरेशी याच्याविरुद्ध मकोका
दरम्यान, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, धमकावणं, पिस्तूल बाळगणं आणि दहशत माजवणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. विश्रांतवाडी आणि येरवडा भागात दहशत माजवणारा गुंड शोएब कुरेशी याच्याविरुद्ध देखील पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. कुरेशीसोबत गुन्हे करणाऱ्या एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कुरेशीने काही दिवसांपूर्वी एका तरुणावर हल्ला केला होता.
