चंद्राई कंट्रक्शनच्या कार्यालयात ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

पुणे प्रतिनिधी -: देशभरात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, पुणे शहरातील चंद्राई कन्ट्रक्शनच्या कार्यालयात चंद्राई कन्ट्रक्शनचे डायरेक्टर मंगेश बेलदरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमात स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानाची आठवण करून देत, नागरिकांना एकतेचा आणि विकासाचा संदेश देण्यात आला.

यावेळी ध्वजारोहण सोहळ्यास उद्योजक स्वप्निल चरवड, उद्योजक मयूर कामठे, उद्योजक अक्षय पडवळ, उद्योजक रमेश चरवड, उद्योजक संतोष माने, चंद्राई कंट्रक्शनचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला, ध्वजारोहणानंतर देशभक्तीपर गीते व मिठाई वाटप करून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.