राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, शहर भाजपाच्या वतीने राज्य सरकारचे आभार – शत्रुघ्न काटे

Share

पिंपरी प्रतिनिधी – : राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तुकडा बंदी कायदा रद्द करण्यात आला आहे. याबाबत विधानसभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा घोषणा केली आहे, यामुळे आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला, यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी महायुती सरकारचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्यक्त केले,यावेळी ते म्हणाले की शेतकऱ्यांबरोबर शहरातील नागरिकांना देखील तुकडा बंदीचा निश्चित मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे अनेक वर्षापासून एक दोन तीन गुंठ्याचे खरेदीखत बंद होते त्यामुळे नागरिक संभ्रमात होते आज सरकारच्या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महायुती सरकार यांचे पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांनी आभार व्यक्त केले.गेल्या अनेक दिवसांपासून हा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सुरू होती.

अखेर हा कायदा आता सरकारने रद्द केला आहे. विधानसभेत या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात घोषणा करताना लवकरच आम्ही एक एसओपी या संदर्भात जारी करू, ज्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचं काम अधिक सोप होईल, त्यांना सरकार दरबारी हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.काय आहे तुकडा बंदी कायदा?तुकडा बंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जमीन खरेदी किंवा विक्री करण्यात प्रतिबंध होता, एक, दोन, तीन अशी गुंठ्यामध्ये जमीन खरेदी किंवा विक्री करता येत नव्हती, मात्र आता हे निर्बंध हटवले जाणार आहेत.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *