लाखो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात पुन्हा ‘मेगा भरती’; मुख्यमंत्री

Share

Devendra fadnavis Mega Bharti in Maharashtra

Mega Bharti in Maharashtra : राज्यातील विविध सरकारी विभागांमधील रिक्त पदांची भरती लवकरच करण्यात येणार असून, यासाठी ‘मेगा भरती’ जाहीर होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

सर्व विभागांना १५० दिवसांत उद्दिष्टपूर्तीचे आदेश देण्यात आले असून, त्यानंतरच रिक्त पदांची अचूक माहिती समोर येणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले, पूर्वी जाहीर केलेल्या ७५ हजार पदभरती कार्यक्रमाअंतर्गत एक लाखांहून अधिक भरती पूर्ण झाली आहे.

अनुसूचित जमातींसाठी विशेष भरती-
अनुसूचित जमाती प्रवर्गातील ६,८६० पदांवर कार्यरत कर्मचारी जात वैधता सादर न करू शकल्यामुळे ही पदे ‘अधिसंख्य’ मानण्यात आली आहेत. या कर्मचाऱ्यांना पदावरून हटवले जाणार नाही, मात्र त्यांना बढती मिळणार नाही. रिक्त झालेल्या १३४३ पदांवर भरती पूर्ण; उर्वरित भरती प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्क घेतल्यास थेट गुन्हा दाखल! सामाजिक न्याय विभागाचा इशारा

सुधारणा व नवीन तंत्रज्ञानाचा वापर
१. ब्लॉकचेन आधारित जात प्रमाणपत्र पडताळणी प्रणाली आणण्याचे प्रयत्न सुरू.
२. जात वैधता समित्यांचे सशक्तीकरण करून प्रक्रिया वेगवान व पारदर्शक करण्याचा निर्णय.
३. सचिवांचा एक स्वतंत्र अभ्यासगट यासाठी तयार होणार.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *