मुदत संपलेल्या 14 हजार ग्रामंपचायतींवर विद्यमान सरपंचांची प्रशासक म्हणून नेमणूक

Pune महाराष्ट्र सरकारने मुदत संपलेल्या 14 हजार ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. ग्रामविकास विभागाचे अवर सचिव बाबुराव म्हादू आसोले त्यांनी याबाबतचे आदेश सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यातील नगरपालिका नगरपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक संपल्यानंतर ग्रामपंचायतीचा धुरळा उडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर या निर्णयामुळे सरपंचांनाच प्रशासक म्हणून नेमणूक मिळणार आहे. तर ग्रामपंचायतीतील सदस्यांना प्रशासकीय समितीत संधी मिळणार आहे.

गावातील सरपंचांना 6 महिने किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याच ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून राहता येणार आहे. शिवाय पंचायतीचे काम सुरळीत चालण्यासाठी उपसरपंच आणि सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करता येणार आहे. प्रशासकीय नियमानुसार सरपंच उपसरपंच आणि समितीचे सदस्यांना कर्तव्याचे पालन करण्यासाठी योग्य सूचना देण्याच्या सल्ला सर्व जिल्हा प्रशासन पातळीवर देण्यात आले आहेत.

सरपंचांकडे राहणार सूत्र

याआधी देखील काही ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. 28 फेब्रुवारी रोजी राज्यातील अनेक ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे. मात्र प्रशासकीय कारणामुळे या निवडणुका घेणे शक्य नसल्याचे सांगत सरकारने हा आदेश काढला आहे. ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यासाठी या सरपंचांना प्रशासक म्हणून नेमण्यात येणार आहे.