Water supply schemes: पाणी योजनांना गती देण्यासाठी समन्वयक अधिकारी नेमा; कलेक्टर चे आदेश आदेश

Pune Update news हर घर जल-जलजीवन मोहिमे’अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी वेगाने व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेबरोबरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने समन्वयक अधिकार्‍यांची नेमणूक करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्.

त्यांनी पुढे सांगितले की, प्रलंबित कामांना गती देणे, स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून अडचणी सोडवणे, पूर्ण झालेल्या योजनांचा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करणे यावर भर दिला जावा. तसेच, या योजनांना महावितरणने तातडीने वीज जोडणी करून द्यावी. पाणीपुरवठा योजनांमध्ये शाश्वत पाण्याच्या स्रोतांचा समावेश करूनच अटल भूजल योजनेअंतर्गत आराखडे सादर करावेत, यापूर्वी जिल्हा भूजल विकास यंत्रणेने स्थळ पाहणी करून जलस्रोतांची तपासणी करणे आवश्यक असल्याचेही डुडी यांनी स्पष्ट केले.

सीईओ गजानन पाटील म्हणाले की, जलजीवन मोहिमेत जिल्ह्यातील 1,836 ग्रामपंचायतींचा समावेश असून, या माध्यमातून 9 हजार 335 वाड्या-वस्त्यांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. जागेबाबत प्रलंबित असलेल्या कामांचा पाठपुरावा करण्यात यावा. स्थानिक पातळीवरील प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी सातत्याने समन्वय ठेवावा.

बैठकीत जलजीवन मोहिमेतील कामांची सद्य:स्थिती, प्रस्तावित आराखडे, प्रगतीपथावरील कामे, अडचणी आणि त्यावरील उपाय याबाबत सविस्तर चर्चा झाली.