माण पंचायत समिती गणात भाजपचा झेंडा फडकणार – युगंधरा पारखी विकासाच्या मुद्द्यावर ठाम असल्याने विजय निश्चित

ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई; जनशक्तीच जिंकेल भाजपाच्या युगंधरा पारखीचां विश्वास

हिंजवडी प्रतिनिधी – : मुळशी पंचायत समितीतील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या माण पंचायत समितीच्या गणाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असून, हीच विकासाभिमुख भूमिका जनतेला भावत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारादरम्यान मिळणारा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे ठाम मत भाजपचे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार सौ. युगंधरा पारखी यांनी व्यक्त केले.

माण (ता. मुळशी) येथे पुणे महानगर न्यूजशी बोलत होत्या.

युगंधरा पारखी म्हणाल्या की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत आहोत शेतमालाला योग्य दर, मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजारपेठेतील सुविधा, तांदुळाला उच्च भाव वाहतूक व साठवणुकीच्या अडचणी यावर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहे.

जनतेचा देखील भाजपवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सर्वसामान्य घटकांची निगडित पक्षाचे विचार व शासकीय योजना नियमित प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे, प्रत्येक घटकाला केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनेचा निश्चितपणे फायदा झाला पाहिजे याच्यासाठी निश्चित मोठा प्रयत्न करत असतो,

उद्याच्या भविष्यकाळात आपल्या भागाच्या विकासासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठा विकास निधी खेचून आणण्याचे काम देखील भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव नवनाथ पारखी हे करू शकतात हे जनता सर्वश्रुत आहे.

माण पंचायत समिती गणाची निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढत असून निश्चित विजयाची आम्हाला आहे आमची लढाईची जनशक्ती विरुद्ध धनशक्ती शी आहे व जनता मात्र आमच्या सोबत आहे यामुळेच आमचा विजय सुखर आहे असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला