वाघोलीत लोकसेवा परिवर्तन फाउंडेशन यांच्या वतीने महा आरोग्य शिबिराचे आयोजन

वाघोली प्रतिनिधी – : लोकसेवा परिवर्तन फाउंडेशन पुणे वाघोली यांच्यावतीने मोफत महा आरोग्य शिबिराचे आयोजन 15 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे.

लोकसेवा परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष केतन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर पाचरणे समाज मंदिर, धोका बिल्डिंग वाघोली पुणे येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वाघेश्वर मंदिराजवळ समोर पार पडणार आहे.

या शिबिरामध्ये नागरिकांसाठी सामान्य आरोग्य तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत डोळे तपासणी,मोफत चष्मे वाटप, मुळव्याध,भगंदर, हरण्या ऑपरेशन, मुतखडा शस्त्रक्रिया, मोफत शरीरावरील गाठी, मेंदू विकार शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया, मणके विकार शस्त्रक्रिया, हृदयरोग शस्त्रक्रिया,रक्तदान शिबिर मोफत, नाक व घसा इत्यादी करण्याची सुविधा निःशुल्क उपलब्ध राहणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक उपकरण देखील वाटण्यात येणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड व रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला हे अनिवार्य असणार आहे

नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण, तपासणी तसेच शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविणे हा या शिबिराचा उद्देश आहे. सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकसेवा परिवर्तन फाउंडेशनचे तथा भारतीय जनता पार्टीचे चिटणीस केतन भैया जाधव यांनी केले आहे.