पुणे प्रतिनिधी (Pune news ) हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखी बससेवा उपलब्ध व्हावी अशी अनेक दिवसापासून मागणी होती, पीएमपीएल प्रशासनाने या मार्गावर बस सेवा सुरू केली आहे(Pune PMPL) हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखी बससेवा उपलब्ध व्हावी अशी अनेक दिवसापासून मागणी होती, पीएमपीएल प्रशासनाने या मार्गावर बस सेवा सुरू केली आहे
वाघोलीतून हिंजवडीसाठी थेट बस नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना रोजच्या प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत होता.
वाघोली ते हिंजवडी माण फेज 3 या नव्याने सुरू करण्यात आलेल्या बसमार्ग क्र 328 चा लोकार्पण सोहळा आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते पार पडला.
पर्यावरण पूरक व अत्याधुनिक अशा ४ स्मार्ट एसी इकोफ्रेंडली इलेक्ट्रिक बसेस कार्यान्वित करण्यात आल्या असून त्या दर तासाला एक बस अशा वारंवारतेने धावणार आहेत.
त्यामुळे वाघोली परिसरातून हिंजवडी आयटी पार्कमध्ये कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांना जलद, आरामदायक आणि पर्यावरण स्नेही सेवा मिळणार आहे.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक संदीप सातव, शासन नियुक्त नगरसेवक, शांताराम बापू कटके व पंढरीनाथ कटके यांच्यासह पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत, पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतिश गव्हाणे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी नारायण करडे, कामगार व जनता संपर्क अधिकारी किशोर चौहान, वाघोली डेपो मॅनेजर विजयकुमार मदगे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाघोली प्रतिनिधी (Pune News) वाघोलीतून हिंजवडीसाठी थेट बस नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना रोजच्या प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत होता.