बाणेर प्रतिनिधी :: म्हाळुंगे येथील वाघेश्वर महिला बचत गटाच्या वतीने म्हाळुंगे गावात सामाजिक भावना जपत शेतकरी ते थेट ग्राहक या आठवडी बाजारचे आयोजन करण्यात आले,शेतकरी गटांनी उत्पादित केलेला ताजा भाजीपाला थेट शहरातील ग्राहकापर्यंत रास्त दरामध्ये उपलब्ध करणे हा शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्याचा हा मुख्य उद्देश असल्याचे वाघेश्वर महिला बचत गटाने याच्यात आग्रहाची भूमिका घेऊन आठवडे बाजार सुरू केला या आठवणी बाजाराचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुखदेव मांडेकर, व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवक कार्याध्यक्ष मनोज बालवडकर, यांच्या हस्ते पार पडले,
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुखदेव मांडेकर म्हणाले की; महिला बचत गटाच्या वतीने आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले आठवडी बाजारामुळे शेतकऱ्यांना देखील रोजगार निर्माण करण्यासाठी बचत गटाचा हातभार लागला ही अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी माजी उपसरपंच विवेक मुन्ना खैरे, युवा नेते रोहनशेठ पाषाणकर यांनी आठवडी बाजाराचे आयोजन केले होते.