पुणे प्रतिनिधी (PDC Back news) पुणे जिल्हा सहकारी बँकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये ठेवी, कर्ज, व्यावसायिक उलाढाल, वसुली, स्वनिधी, नफा, नेटवर्थ, ठेवी, कर्जे, एन.पी.ए. वसुली प्रोव्हिजन कव्हरेज रेशो या सर्व पातळीवर ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे.
बँकेची गत वर्षाच्या तुलनेत व्यवसायामध्ये ३०७३ हजार कोटी ६६ लाख रुपयांची भरीव वाढ होऊन २६ हजार ८२६ कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल झाली आहे. बँकेस तरतूदपूर्व नफा ४३९ कोटी ६१ लाख रुपये व निव्वळ नफा ७५ कोटी ७५ लाख रुपयांचा झाला आहे,
यावेळी उत्कृष्ट शाखा विकास अधिकारी, विविध कार्यकारी, सेवा सोसायटी, सचिव यांना पुरस्काराने गौरवण्यात आले.
राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने आयोजित केलेल्या सेवक व अधिकारी गौरव समारंभात बँकेतील उत्कृष्टपणे काम केलेल्या अधिकाऱ्यांसाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा बँकेमार्फत केले होते.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम पार पडला यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गडे सर, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी नाना होळकर, प्रवीण शिंदे, पूजाताई बुट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक राजेंद्र शितोळे अजित जाधवराव, संजय शितोळे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.