पुणे प्रतिनिधी :: सतेज संघ बाणेर आयोजित, कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी, चषक निमंत्रित पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा व पुरुष व महिला ‘पुणे लीग कबड्डी स्पर्धेचेही उद्घाटन आज केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांच्या हस्ते पार पडले,या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले होते,
या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकारमंत्री मुरली अण्णा मोहोळ, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ, मंगलदास पांडे, आस्वाद पाटील, पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, सचिन भोसले, राहुल बालवडकर, नंदकुमार धनकुडे, समीर चांदेरे, नसीर सय्यद, अर्जुन शिंदे, माणिक गांधिले, दत्तात्रय कळमकर, रामदास धनकुडे, संतोष भुजबळ, युवराज धनकुडे, हरिश्चंद्र मोहिते, संतोष कळमकर, इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री यांना मुरली मोहोळ म्हणाले की; प्रो कबड्डी मुळे खेळाला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे, कबड्डी खेळाचे नावलौकिक देशभर मोठ्या झपाट्याने वाढत चालले आहे, बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्यावतीने नेहमीच कबड्डी स्पर्धेचे मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते, भविष्यात कबड्डीची लोकप्रियता मोठी वाढत चालली आहे, कबड्डी, खोखो, व अशा अनेक स्पर्धा भरवण्यासाठी नेहमीच कायम सोबत राहू असे आश्वासन मोहोळ यांनी दिले. राज्यस्तरीय स्पर्धेकरिता पुरुषांचे 12 संघ व महिलांचे 12 संघ तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिह्यांतून एपूण 336 खेळाडूंनी (पुरुष व महिला) या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला. तसेच पुणे लीग स्पर्धेकरिता पुरुषांचे 8 संघ व महिलांचे 8 संघ तयार करण्यात आले आहेत. पुणे जिह्यातून एपूण 352 खेळाडूंनी (पुरुष व महिला) या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.पुणे लिग स्पर्धेत छावा पुरंदर, लय भारी पिंपरी-चिंचवड, शिवनेरी जुन्नर, सिंहगड हवेली, वेगवान पुणे, बलाढय बारामती, झुंजार खेड, माय मुळशी हे पुरुषांचे व महिलांचे संघ कौशल्य पणाला लावणार आहेत. ही स्पर्धा मॅटवर होणार असून 6 मॅटच्या क्रीडांगणावर या स्पर्धेचा थरार अनुभवयास मिळणार आहे. दोन्ही स्पर्धांतील विजेत्यांना एपूण 30 लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. दोन्ही स्पर्धांतील विजेत्या व उपविजेत्या संघांना अनुक्रमे अडीच लाख व दीड लाख रुपयांची पारितोषिके मिळणार आहेत. याचबरोबर तृतीय व चतुर्थ स्थानी राहणाऱ्या संघांनाही अनुक्रमे एक-एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. शिवाय दोन्ही स्पर्धांतील सर्वोत्पृष्ट खेळाडू, सर्वोत्पृष्ट चढाई व सर्वोत्कृष्ट पकड, यासाठी प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.