शिवसेनेच्या संदीप मते यांना मिळाली नवी ओळख; लाडक्या बहिणीकडून लाडका भाऊ म्हणून उल्लेख
Pune Update News – : खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 33 मधील महिला भगिनींसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने व शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संदीप पाटीलबुवा मते यांच्यावतीने भव्य उज्जैन महाकाल दर्शन यात्रा आयोजित केली होती.
पहिला टप्प्यात तीन हजार महिलांनी सहभाग घेत सर्वांना VIP दर्शनाचा अनुभव आला; नोंदणी अधिक झाल्यामुळे दुसऱ्या टप्प्याचे देखील आयोजन संदीप मते यांच्या वतीने करण्यात आले. उद्या दिनांक 10 डिसेंबर दुपारी 3 वाजता या टप्प्याच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे अशी माहिती आयोजकाकडून देण्यात आली आहे.
मोफत श्री महाकालेश्वर उज्जैन यात्रेमुळे महिला भगिनींनी शिवसेनेचे संदीप मते यांचे आभार व्यक्त केले.
संदीप मते यांनी बोलताना प्रभागातील माता-भगिनींसाठी महाकाल यात्रा आयोजित करण्याचा घेतलेला संकल्प सांगितला. ते म्हणाले, ‘महाकाल यात्रा हा माझा जनसेवेचा संकल्प आहे. आज पहिल्या टप्प्यात 3000 भगिनींना ओळखपत्र दिले असून, एकूण 10,000 महिलांना उज्जैन दर्शन घडविण्याचा माझा संकल्प आहे.ते पुढे म्हणाले.’आजवर 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या तत्त्वावर काम केले. यापुढेही प्रभागातील जनतेसाठी कटिबद्ध राहणार आहे.’
