पुणे प्रतिनिधी (Uddhav Thackeray) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप अशा विविध उपक्रमांचे मुंबईसह राज्यभरात आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना मार्गदर्शनाखाली शिवसेना आरोग्य सेना जिल्हाध्यक्ष माधव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मुळशी तालुक्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,
या शिबिरामध्ये मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत मी या शिबिरामध्ये जनरल सर्जरी, नेत्ररोग डोळ्यांची तपासणी, जनरल फिजिशियन, हाडांचे विकार अस्थिरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ असे विविध तज्ञ डॉक्टर या शिबिरामध्ये असणार आहेत, उद्या दि.२८/ जुलै रोजी वार सोमवार आयोजन केले आहे, तरी मुळशी तालुक्यातील नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान आरोग्य सेना जिल्हाध्यक्ष माधव आबा शेळके यांनी केले आहे.