धनकवडी प्रतिनिधी :: सरकारी कामांसाठी सोयीचे ठरलेले ‘ई-सेवा केंद्र’ आणि ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता नागरिकांची अडवणूक करत असल्याचे समोर येत आहे. विशेषतः उत्पन्न, जात किंवा नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून निर्धारित शुल्कापेक्षा अनेक पटींनी जास्त पैसे उकळले जात असल्याचा अनेक वेळा आरोप झालेले आहेत,
याच पार्श्वभूमीवर पुणे शहराचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा नेते तुषार केशव नांदे यांच्या माध्यमातून विनामूल्य महा-ई-सेवा लाभ देण्यात येत आहे,
आमच्या प्रतिनिधीने तुषार नांदे यांना विचारले असता ते म्हणाले की; विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या किंवा शासकीय कामासाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता नागरिकांना भासत असते याच पार्श्वभूमीवर आपल्या परिसरातील नागरिकांसाठी
विनामूल्य सेवा देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत.
विनामूल्य मिळणाऱ्या सेवा
१) उत्पन्नाचा दाखला
२) जातीचा दाखला
३) डोमेसाईल/ रहिवासी दाखला
४) नॉनक्रिमीलेयर
५) ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
६) शहरी गरीब योजना कार्ड
७) महिला सक्षमीकरण योजना
८) १०/१२ वी शिष्यवृत्ती (Scholarship) पुणे म न पा
९) रेशन कार्ड संबंधित सर्व कामे
(नाव वाढविणे, नाव कमी करणे तसेच नवीन रेशन कार्ड)
१०) नव मतदान नाव नोंदणी तसेच मतदार कार्ड
११) आधार व मतदार कार्ड मोफत स्मार्ट कार्ड
स्थळ :- महा ई-सेवा केंद्र
श्री. तुषार केशव नांदे यांचे जनसंपर्क कार्यालय
शॉप नो. २, पद्मावती नगर सो. गेट जवळ, संभाजी नगर, धनकवडी, पुणे – ४११०४३