तुकडेबंदी कायदा रद्द होण्याची शक्यता? एक गुंठा जमिनीचा तुकडा पाडता येणार – महसूलमंत्री

Share

पुणे प्रतिनिधी :: पुणे शहर ग्रामीण ठाणे पिंपरी चिंचवड शहरीकरण जास्त झालेल्या शहरांमध्ये तसेच आसपासच्या परिसरात शेती क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी तुकडेबंदी कायदा रद्द करावा, अशी महत्त्वपूर्ण शिफारस महसूल आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्य सरकारला केली आहे.

रहिवासी क्षेत्रामध्ये एक गुंठा जमिनीचा तुकडा पाडता येईल, असा कायदा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आणू, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये तुकडे बंदी कायद्याची सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महसूल विभाग सुधारणेचे पुढचे पाऊल टाकतो आहोत.

राज्यात महायुती सरकार आल्यानंतर महसूल खात्यामध्ये जवळपास महत्त्वाचे १७-१८ निर्णय आम्ही घेतले. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. अधिवेशनात वन स्टेट वन रजिस्ट्रेशन, व्हर्टिकल स्वामित्व देण्याबाबत प्रयत्न करणार आहोत.”


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *