गुंठेवारीचे व्यवहार होणार कायदेशीर; प्रॉपर्टी कार्ड अन्‌ गृहकर्जही मिळणार; जुना प्लॉट विकता येणार

Pune news 

(Maharashtra Winter Session 2025) सुरु आहे. यावेळी राज्यातील नागरी वस्त्यांमध्ये गुंठेवारी किंवा लहान भूखंडांवर राहणाऱ्या सुमारे 60 लाख कुटुंबांना म्हणजे, सुमारे तीन कोटी नागरिकांना दिलासा देणारे ऐतिहासिक तुकडेबंदी (Tukdebandi) कायद्यातील जाचक अटी शिथिल करणारे ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, 2025’ (Maharashtra Land Revenue Code Amendment Bill 2025) आज विधानसभेत मंजूर करण्यात आले.

गुंठ्याची खरेदी करून घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी संबंधित व्यक्तीस जागेच्या चालू मूल्यांकनानुसार स्टॅम्प ड्युटी आणि ज्यावेळी त्याने नोटरी केली तेव्हाच्या मुद्रांक शुल्कावर दरमहा २ टक्के दंड, अशी रक्कम भरावी लागणार आहे.

शहराच्या गावठाण भागात रहायला जागा नसल्याने शहराच्या हद्दीतच एक-दोन गुंठे जागा घेतली. पण, गुंठेवारीला परवानगी नसल्याने त्या जागेची नोटरी केली. गुंठेवारीच्या परवानगीची वाट पहात अनेकांनी त्या जागांवर पक्की घरे देखील बांधली. मात्र, त्यांना ना प्रॉपर्टी कार्ड मिळाले ना जागेची अधिकृत मालकी मिळाली. त्यामुळे त्यांना बॅंकांकडून गृहकर्ज देखील घेता येत नव्हते. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आणि नोटरीवर जागा घेतलेल्यांना मोठा दिलासा दिला.

दुसरीकडे अनेकांनी २०- २५ वर्षांपूर्वी काही गुंठे जागा घेऊन ठेवली, पण आता अडचणी असताना देखील त्यांना गुंठेवारीला परवानगी नसल्याने विकता येत नव्हती. त्यांना देखील या निर्णयामुळे गुंठ्यांची विक्री करता येणार आहे. नोटरी केलेल्यांना खरेदीपूर्वी जागेच्या मूल्याकंनानुसार (चालू बाजारभावाप्रमाणे) स्टॅम्प ड्युटी आणि मुद्रांक शुल्कावर नोटरी केलेल्या दिवसापासून दरमहा दोन टक्के दंड, अशी रक्कम जिल्ह्याच्या मुद्रांक शुल्क कार्यालयात भरावे लागेल. त्यानंतर ती जागा मुद्रांकित होईल आणि मग त्याची खरेदी करता येणार आहे.

पूर्वीच्या गुंठ्याची खरेदी अशी…

एखाद्याने पूर्वीच दोन-चार गुंठे जागा खरेदी केली आहे, पण त्याला गुंठेवारीस परवानगी नसल्याने विकता आली नाही. त्या व्यक्तीस आता त्या गुंठ्याची थेट खरेदी-विक्री करता येणार आहे. त्यासाठी त्या जागेचा सातबारा उतारा, आठ-अ, सहा-ड आणि जागेचा झोन नकाशा, अशी कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयात जागेच्या मूल्यांकनाच्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटी भरून गुंठ्याची विक्री करु शकतो.

नोटरी केलेल्यांना करता येणार गुंठ्यांची खरेदी

राज्याच्या महसूल विभागाच्या निर्णयानुसार १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या काळातील शहरांच्या हद्दीतील गुंठ्यांचे व्यवहार नियमित होणार आहेत. त्यासाठी त्यांना स्टॅम्प ड्युटी, मुद्रांक शुल्कावरील दंड भरून घ्यावा लागेल. त्यानंतर संबंधितास त्या गुंठ्याच्या खरेदीस परवानगी मिळेल. पण, आता कोणी त्याच्या जमिनीचे गुंठे विकणार असेल तर त्यांना परवानगी नाही.

– अनिकेत बनसोडे, जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी, सोलापूर

गुंठेवारी खरेदीसाठी आवश्यक कागदपत्रांविषयी माहिती उपलब्ध नाही, परंतु जमीन खरेदी करताना कोणती कागदपत्रे तपासावी लागतात, याची माहिती खालीलप्रमाणे आहे:

  • मालमत्ता खरेदी करताना, मालमत्ता कायदेशीर आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे, कारण एक छोटीशी चूक देखील तुमचे नुकसान करू शकते 10.
  • यामध्ये सातबारा (७/१२) उतारा, प्रॉपर्टी कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे 3.
  • गुंठेवारी खरेदी-विक्रीचे व्यवहार कायदेशीर करण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड आणि गृहकर्ज मिळण्यास मदत होते 5.
  • १९६५ ते ऑक्टोबर २०२४ पर्यंतच्या गुंठेवारी व्यवहारांना कायदेशीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे लोकांना मालमत्तेचे मालकी हक्क मिळण्यास मदत होईल 7