Pune विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ आहे. बारामतीसह राज्यभरातील सत्ताधाऱ्यांसह विरोधक तसेच पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अन् सर्वसामान्य लोकांकडून शोक व्यक्त करत, अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.
यातच, एकनाथ शिंदे शिवसेनेचे(Shivsena) संगमनेर शहराध्यक्ष दिनेश फटांगरे याने आक्षेपार्ह पोस्ट केल्याचं समोर आलं. यावरून राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यक्रमांचा संताप अनावर झाला. शिंदेसेनेच्या शहराध्यक्षाविरोधात कायदेशीर कारवाईसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांकडून सुरूवातीला प्रतिसाद मिळत नसल्याने, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संताप अनावर झाला.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संयम सोडत, संतापाला वाट मोकळी करून दिली. कारवाईची मागणी करत, पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. यानंतर वरिष्ठ पोलिसांनी अन् ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मध्यस्थीची भू्मिका घेतली. पोलिसांनी यानंतर प्रकाराची नोंद घेतली.
दरम्यान, संगमेनरचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी अजितदादांचा निधनावर प्रतिक्रिया देताना सकाळीच शोक व्यक्त केला होता. त्याचवेळी दुसरीकडे दिनेश फटांगरे याची सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट समोर आली. या प्रकाराची आमदार खताळ यांनी गंभीर दखल घेत, दिनेश फटांगरे याच्यावर पक्षपातळीवर कारवाईचा आदेश दिला.
अहिल्यानगर उत्तरचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते पाटील यांनी, आमदार अमोल खताळ यांच्या आदेशानुसार, दिनेश फटांगरे याची संगमनेर शहराध्यक्षपदावर तत्काळ हकालपट्टी केली. पक्षपातळीवर ही कारवाई झालेली असली, तरी संगमनेर पोलिस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागलं आहे.
