सुरानंद फाउंडेशनच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Share

पुणे प्रतिनिधी : (Pune Social work) शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करतांना भौतिक सुविधा आणि गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेणे तितकेच आवश्यक असून त्यादृष्टीने वाढदिवसाचे औचित्य साधत सुरानंद फाउंडेशनच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले,

सुरानंद फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वास नंदकुमार कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त राजगड तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या बालवड, खोपडेवाडी, कोंढाळकरवाडी, येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बॅग, रेनकोट शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

या परिसरातील शाळेला अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असतो याच पार्श्वभूमीवर फाउंडेशनच्या वतीने वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न फाउंडेशन च्या वतीने केला आहे या उपक्रमात हिंदू युवा प्रबोधिनीचे संस्थापक राजेंद्र बेंद्रे, उद्योजक किरण शेळके, उद्योजक दादासाहेब दाभाडे, किरण आदक, मनीषा कळमकर हे उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *