सुरज चव्हाणला राष्ट्रवादीत नो एंट्री; पक्षाकडून कायमचे दार बंद अजितदादांचा निर्णय

Share

पुणे प्रतिनिधी (Ajit Pawar) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांना छावा संघटनेचे विजय घाडगे यांना मारहाण करणे चांगलीच महागात पडली आहे,

आज पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे मुख्य नेते अजित दादा पवार यांनी छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय घाडगे यांची भेट घेतली, भेट घेतल्यानंतर घाडगे यांनी माहिती दिली ते म्हणाले की सुरज चव्हाणला पक्षात स्थान नाही या मारहाण प्रकरणामुळे सुरज चव्हाण यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. 

यापूर्वी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुरज चव्हाण यांच्या बद्दल नाराजी व्यक्त केली होती

अजित पवार उत्तम प्रशासक व प्रशासन चालवणारे व काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते मात्र पक्षात अशा घटनेमुळे त्यांचे नाव खराब होण्यासाठी विरोधकांकडून नेहमीच मदत होते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत गुंडगिरीला स्थान नाही असे सुरज चव्हाण यांच्या निर्णयावरून दिसून येते.

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पोलिसांना सूचना

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन जो कोणी वर्तन करेल त्याला स्वीकारले जाणार नाही अशा स्पष्ट सूचना मारहाण प्रकरण झाल्यानंतर अजितदादांनी दिल्या होत्या, त्यामुळे सुरज चव्हाणला कायमस्वरूपी पक्षाचे दारे बंद झाली आहेत 

एसपींना फोन करत सूचना

घाडगे यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लातूर एसपींना फोन करत निष्पक्षपणे चौकशी करत कठोर भूमिका घेण्याच्या सूचना केल्या.

काय आहे प्रकरण?

छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी पत्ते उधळत कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी विजय घाडगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या २-३ कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेचे पडसाद सगळीकडे उमटले. रविवारी रात्री उशिरा औसा रोडवर छावाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी अजित पवारांचे बॅनर फाडून जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या. शहरातील संवेदनशील भागात पोलिसांनी गस्त घातली. कुणीही कायदा हातात घेऊ नये यासाठी पोलीस प्रयत्नशील होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *