वाल्मीक कराड संदर्भात सुप्रिया सुळे यांनी घेतली शहाची भेट

वाल्मिक कराड बाहेर येणार? संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुनावणीअगोदर घडामोडींना वेग; सुप्रिया सुळे थेट अमित शहांच्या भेटीला

औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान या सुनावणीअगोदरच घडामोडींना वेग आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे राज्यातील विविध प्रश्न मांडले. यामध्ये मस्साजोग येथील सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोरात शासन व्हावे ही मागणी मांडली. बीड जिल्ह्यातील स्व महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणी तपासात कसलीही प्रगती होताना दिसत नाही. स्व. मुंडे यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर गजाआड करुन त्यांना कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका मांडली. फलटण येथे झालेल्या स्व. डॉ संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी लवकरात लवकर तपास पूर्ण करुन दोषी व्यक्तींना शासन व्हावे व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केली.