प्रभाग क्र.02 मध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा निखिल बोऱ्हाडे यांना पाठिंबा

प्रभागातील नागरिकांचा जनसंवाद चर्चेला मिळतोय मोठा पाठिंबा

पिंपरी प्रतिनिधी -: प्रभाग क्रमांक 02 मधील मोशी बोऱ्हाडेवाडी परिसरात भारतीय जनता पार्टीच्या निखिल बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित जनसंवाद रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीदरम्यान घरोघरी भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. भाजपा नेते, आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागातील विकासासाठी ठोस प्रयत्न करणार असून नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवणार आहे अशी ग्वाही या निखिलदादा बोऱ्हाडे यांनी दिली.

या जनसंवाद रॅलीत घरोघरी पत्रक वाटप करण्यात आले.माता भगिनींकडून प्रेमळ औक्षण करण्यात आले तर ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिले. तरुणांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. नागरिकांचा विश्वास हीच माझी ताकद असल्याची भावना यावेळी निखिलदादा बोऱ्हाडे यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठांच्या भावना

निखिल बोऱ्हाडे हे उत्तम कार्यकर्ते असून कामाची क्षमता असलेले असणारे नेतृत्व म्हणून यांच्याकडे पाहिले जाते आमच्या ज्येष्ठांच्या अनेक समस्या त्यांनी फक्त फोनवर सोडवल्या आहेत अशी भावना ज्येष्ठ नागरिक – दिनेश लोखंडे यांनी व्यक्त केली

आमच्या सोसायटीतील अनेक समस्या त्यांनी वारंवार पाठ पुरवठा करून सोडवले आहेत त्यामुळे त्यांचे आभार गेल्या दोन वर्षापासून जे कामे झाली नव्हते ती कामे निखिल दादांनी त्यावेळी केली त्यामुळे आम्ही निश्चित त्यांच्या पाठीमागे उभा राहू

सविताताई कुलकर्णी