बाणेर प्रतिनिधी :: स्मार्ट सिटी परिसराचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाषाण-सुस मुख्य रस्त्यापासून रावीनगर सोसायटी कडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खराब होती नागरिकांना याचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागत होता, शाळेत जाणारे विद्यार्थी महिलावर्ग यांना सातत्याने मोठा त्रास सहन करावा लागला होता,
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते बाबुराव चांदेरे यांनी या कामाला निधी आणत कामाला सुरुवात केली या कामाचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या सिमेंट कॅाक्रिटीकरण उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे उपाध्यक्ष श्री. अर्जुन ननावरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कामामुळे रावी नगर सोसायटी परिसरातील नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल, उद्घाटनाच्या कामाप्रसंगी नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद देखील पाहायला मिळाला.
