सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज, ११ ऑगस्ट २०२५ रोजी, सोमवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत?(Gold-Silver Price On 11 August 2025)बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ११ ऑगस्ट २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १०१,१४० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ९२,७१२ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ११४,५३० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,१४५ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…
