सामाजिक कार्यासाठी रणजीत हारपुडेंचा उपक्रम आदर्शवत : मंत्री चंद्रकांतदादा पाटील

Share

पुणे प्रतिनिधी (Pune Update news Chandrakant Patil) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सर्वत्र विविध उपक्रमाने अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला, रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड, अनाथांना जेवण, अशा विविध उपक्रमाने अनोखा वाढदिवस साजरा झाला, पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातील सुतारदरा येथे नागरिकांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला,

यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil Minister of Higher and Technical Education of Maharashtra) हे म्हणाले की देवेंद्रजी फडणवीस यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे, जवळपास ते 18 तास काम करतात महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीकडे जात आहे, व त्यांच्या वाढदिवसानिमित्त रणजीत पांडुरंग हारपुडे, व लक्ष्मी रणजीत हारपुडे यांच्या वतीने सुतारदरा येथील नागरिकांना एक हजार छत्री वाटप त्यांनी केली आहे याबद्दल त्यांचे कौतुक देखील केले,

या कार्यक्रमाला माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, माजी नगरसेविका छाया मारणे, प्रभाग अध्यक्ष अतुल शिंदे, नाना कुंबरे, अजय मारणे व इतर भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *