Pune News – Shivsena महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे १० नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर यातील ९ नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र, आता गेल्या तीन वर्षात एकएक करून शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करत दुसऱ्या पक्षामध्ये उड्या मारल्या आहेत.
शिवसेना उबाठा मुक्त पुणे’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
नाना भानगिरे यांनी सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात बाळा ओसवाल, विशाल धनवडे, प्राची अल्हाट, पल्लवी जावळे आणि संगीता ठोसर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोरदार झटका बसला होता. त्यानंतर अविनाश साळवे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी काँग्रेसतर्फे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केला होता. दोन दिवसांपूर्वी श्वेता चव्हाण यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले या दोन जुन्या निष्ठावान शिवसैनिकांनी अखेर उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करून भाजपमध्ये प्रवेश केला.
