शिवसेनेच्या नाना भानगिरेनां; राष्ट्रवादीच्या निवृत्ती बादलांचे मोठे तगडे आव्हान

भानगिरेनां स्वपक्षीय नाराजीचा मोठा फटका बसणार

हडपसर प्रतिनिधी -: पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही भाजप आणि शिंदेसेना यांची युती झालेली नाही. त्यामुळे शिंदेसेनेने ही निवडणूक स्वबळावर लढविण्याचे ठरवून सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले.

शहरप्रमुख नाना भानगिरेचा डाव धंगेकारांनी फिरवला

पुणे शहरात भारतीय जनता पार्टी सोबत युती व्हावी म्हणून नाना भानगिरे आग्रही होते मात्र शिवसेनेचे पुणे शहर महानगरप्रमुख रवींद्र धंगेकरांना सोडून त्यांनी परस्पर बैठका आयोजित केल्या; त्यामुळे भाजप सेनेत मिठाचा खडा पडला युती तुटली.

प्रभाग क्रमांक 41 स्वतः शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद उर्फ नाना भानगिरे हे निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तगडा चेहरा मैदानात उतरवल्यामुळे शिवसेनेच्या देखील मोठ्या अडचणी वाढल्या आहेत त्यातच युती तुटली यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या प्रभागात भक्कम पाहायला मिळत आहे.

जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अण्णा बांदल यांची व शहराध्यक्ष नाना भानगिरे समोरासमोर लढत होणार आहे;

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रभाग क्रमांक 41 मध्ये दिग्गज उमेदवार दिल्यामुळे भाजप व शिवसेनेची मोठी कोंडी येथे पाहायला मिळत आहे पुणे महापालिकेचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेले फारुक इनामदार माजी सभापती सचिन घुले यांच्या पत्नी श्वेता घुले ज्येष्ठ नेते निवृत्ती अण्णा बांदल, अश्विनी सूर्यवंशी यांची प्रमुख लढत शिवसेनेच्या उमेदवारांशी होईल.