धायरी प्रतिनिधी :: किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल & ज्युनिअर कॉलेज धायरी रायकर मळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुका प्रमुख दत्तानाना रायकर, अनिल रायकर,तसेच जेष्ठ नागरिक पंढरीनाथ रायकर, हनुमंत रायकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरैय्या शेख, माधुरी पाटील, अंजुम शेख तसेच सर्व शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित विविध भाषणे सादर केली. तसेच पारंपरिक नृत्याविष्कार, शिवगर्जना, गड-किल्ल्यांची माहिती देणारी सादरीकरणे यांमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, नेतृत्वगुण व स्वराज्याची संकल्पना प्रभावीपणे मांडली.
अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, संस्कार व इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम शाळेमधून केले जाते.
एकूणच शिवजयंतीचा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.
धन्यवाद
