शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी, निवडणूक अधिकाऱ्यांची धाड;

Pune news शिंदे शिवसेनेचे नेते सांगोल्याची माजी आमदार शहाजी बापूं पाटील यांच्या कार्यालयावर धाड पडली. LCB आणि निवडणूक आयोगाच्या पथवाकडून यावेळी रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आली. शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड पडल्याने एकच खळबळ उडाली.

सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला आपला पराजय दिसत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने त्यांनी ही कारवाई केली आहे, असे थेट शहाजी बापू यांनी म्हटले.

शहाजी बापू यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी दिले उत्तर

हेच नाही तर कारवाईनंतर शहाजी बापू यांना अश्रू अनावर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही सगळी माहिती देणार असल्याचे त्यांनी म्हटले. शहाजी बापू यांच्या कार्यालयावर धाड पडल्याच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, सत्तेत आहे की, बाहेरून आहे यावर धाड ठरत नसते. माझीही गाडी तपासली जाते.