बालेवाडी प्रतिनिधी :: बाणेर-बालेवाडी सुस माळुंगे या भागातील वाढती लोकसंख्या, उंच इमारतींची संख्या आणि आपत्ती अथवा अपघाताच्या वाढत्या शक्यता लक्षात घेता, फायर स्टेशन ही प्राथमिक आणि अपरिहार्य गरज होती.बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत गरजेचे असलेले अग्निशमन केंद्राचे काम अनेक वर्षापासून रखडलेले होते याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर कार्याध्यक्ष गणेश कळमकर व पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका ज्योतीताई कळमकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या गोष्टीचे गांभीर्य लक्षात आणून दिले त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना फैलावर घेत निधी मंजूर करत काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या व या मागणीला मोठे यश येत परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत गरजेचे असलेले अग्निशमन केंद्र अखेर अखेर सुरू झाले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही सुविधा अत्यावश्यक होती. अखेर सात वर्षानंतर हे केंद्र सुरू झाले आहे. २०१८-१९ मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आणि दीड वर्षांपूर्वीच हे काम पूर्णत्वास आले होते. मात्र प्रशासकीय पातळीवरील विलंबामुळे सुविधा सुरू होण्यास वेळ लागला.या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे या कामाला गती मिळाली आहे यांचे मनापासून आभार मानले आहेत. बाणेर पाषाण सुस बालेवाडी नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळू शकेल, ज्यामुळे परिसराची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल असे कळमकर म्हणाल्या.