पुणे प्रतिनिधी -(Pune update news) खडकवासला विधानसभा मतदारसंघातील किरकटवाडी येथे नवीन पोलीस चौकीच्या जागेत आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले,
नांदेड सिटी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी गावातील आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक सुभाष हगवणे, उमेश हगवणे, राहुल नरहरी पोकळे, विलास सोळुंखे, विजय सोंडकर, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत, नागरिकांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे असे आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक सुभाष हगवणे म्हणाले.
