SC आरक्षणाकडे वाकड्या नजरेने बघाल तर; लक्ष्मण हाकेंवर आठवले गटाचे विशाल शेळके भडकले

मुळशी प्रतिनिधी – : Laxman Hake : हाकेंची नवी उडी…नाभिक, धोबी समाजालाही SC तून आरक्षण द्या, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी नाभिक आणि धोबी समाजांसाठी अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाची नवीन मागणी केली आहे.

त्यांच्या मते, हे समाज इतर राज्यांत एससी वर्गांत मोडतात. मात्र, आरपीआयचे आठवले गटाचे पुणे जिल्हा युवानेते विशाल भीमराव शेळके यांनी या मागणीचा निषेध केला आहे. शेळके यांच्या मते, हाके यांच्या सल्ल्यामुळे महाराष्ट्रातील जातीय सलोखा बिघडू शकतो. त्यांनी हाके यांना असा अतिउत्साह दाखवू नये असा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रात नाभिक आणि धोबी समाजाला सध्या ओबीसी आरक्षण मिळते. हाके यांची मागणी आणि खरे यांचा विरोध यामुळे महाराष्ट्रातील आरक्षणाचा वाद अधिक तीव्र झाला आहे.

लक्ष्मण हाके हे गेल्या अनेक दिवसापासून गुना गोविंदाने राहणाऱ्या समाजाला जातीत विभागणी करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम व त्यातून आर्थिक बाजू भक्कम करण्याचे काम करत आहेत, एस सी (SC) समाजाच्या आरक्षणाकडे वाकड्या नजरेने पहाल तर याद राखा असा सजड इशाराही आरपीआयचे (आठवले गट) पुणे जिल्हा युवा नेते विशाल शेळके यांनी दिला आहे.