शरद पवारांचे (Sharad Pawar) तब्बल 17 वर्ष विशेष कार्याधिकारी म्हणून काम पाहणारे सतीश राऊत (Satish Raut) पुन्हा आपल्या मुळ विभागात परतले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची 1 वर्षासाठी महसूल विभागाने (Ministry of Revenue) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute) या संस्थेवरील प्रतिनियुक्तीवर 1 वर्षासाठी सचिव म्हणून मुदतवाढ दिली होती.
त्यामुळे त्यांना शरद पवारांकडे विशेष कार्याधिकारी म्हणून काम करण्यासाठी 1 वर्षाची मुदत राऊत यांना मिळाली होती. या नियुक्तीला अवघा 1 महिना पूर्ण होत असतानाच अचानक सतीश राऊत पुन्हा एकदा आपल्या मूळ विभागात परतल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Satish Raut : नियुक्तीला अवघा 1 महिना पूर्ण, पुन्हा एकदा आपल्या मूळ विभागात
दरम्यान, शरद पवार यांच्या राजकारणातील पडद्यामागच्या अनेक गोष्टींचे साक्षीदार म्हणून सतीश राऊत यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. आपण पुन्हा मूळ विभागात परतल्याची माहिती स्वतः सतीश राऊत यांनी सोशल मीडियात प्रसिद्ध केली आहे. मात्र नियुक्तीला अवघा 1 महिना पूर्ण होत असतानाच अचानक सतीश राऊत पुन्हा एकदा आपल्या मूळ विभागात परतल्यानेअनेकतर्क-वितर्कलावलेजातआहे. मात्रयामागीलनेमकंकारणकाय? हेअद्यापकळूशकलेलंनाही.
