संदीप बेलदरेनां संधी म्हणजे प्रभागातील प्रत्येक नागरिकांना नगरसेवक झाल्याची भावना
कात्रज प्रतिनिधी -: महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळची निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून अनेक स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे.
पुणे महापालिकेत यावेळेस अनेक प्रभागांमध्ये पारंपरिक दोन पक्षांमधील लढत न होता, ती चौरंगी किंवा पंचरंगी होताना दिसत आहे. काही ठिकाणी माजी नगरसेवक समोरासमोर ठाकले आहेत, तर काही ठिकाणी पक्षांतर्गत बंडखोरीने गणिते बिघडवली आहेत. बंडखोर उमेदवारांनी अन्य पक्षांची साथ घेतल्याने किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्याने प्रस्थापित पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
प्रभाग 38 (बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज)
दत्तात्रेय धनकवडे (राष्ट्रवादी) विरुद्ध संदीप बेलदरे यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दत्तात्रय धनकवडे यांच्या अडचणीत मात्र वाढ होताना दिसून येत आहे;
संदीप बेलदरे सारख्या उच्चशिक्षित व प्रामाणिक कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यामुळे परिसरातील नागरिकांनी एकतर्फी पाठिंबा देण्यासाठी नागरिक समोर येत आहेत अशी भावना भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष ताठे यांनी व्यक्त केली.
यावेळी ते म्हणाले की संदीप बेलदरे सारखा कार्यकर्ता नगरसेवक झाल्यावर प्रभागातील प्रत्येकच जर नगरसेवक झाल्याची भावना आपल्या सर्वांमध्ये होऊ शकते विकासाची कामे संदीप भाऊ करू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
