Pune News आय लव्ह मोहम्मद’ रस्त्यावरील रांगोळीवरून अहिल्यानगरमधील मुस्लिमांचा जमाव आक्रमक करत रस्त्यावर उतरला. दीड तास रास्ता रोको आंदोलन करताना तेथून जाणाऱ्या ग्रामीण भागातील मुलाला, ज्याने डोक्याला टिळा लावला होता, त्याला मारहाण केली.
आक्रमक झालेला मुस्लिम जमाव शहरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांना दगडफेक सुरू केली. यातून उफाळलेल्या हिंसाचारावर राजकीय पडसाद उमटू लागले आहे. अहिल्यानगरमधील हिंसाचाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संग्राम जगताप यावरून सुरूवातीपासून आक्रमक असून, त्यांनी ‘आय लव्ह महादेव’चा नारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले, “झालेल्या प्रकाराची माहिती घेत आहे. पण अहिल्यानगर शहरात वेगवेगळी फलक लागली जात आहे. यावरून त्यामागे काही कटकारस्थान आहे का? तिथं कोणी सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी प्रयत्न करतं आहे का? लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात वेगळं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. तसंच काही आता प्रकार होत आहे का? या सर्वांची चौकशी केली जाईल.”
