पुणे प्रतिनिधी :: पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी सहकारी बँक ओळखली जाते,
विविध कार्यकारी सोसायटी सोसायटीच्या खेचरे, शेरे, चांदवली, या विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली, सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली मात्र शेतकऱ्यांनी व सर्व सभासदांनी सर्वसाधारण सभेला भरघोस प्रतिसाद दिला यावेळी सर्व संस्थांचे चेअरमन व्हाईट चेअरमन संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
यावेळी पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील सुनील चांदेरे यांनी सर्व संचालकांना सभासदांना जिल्हा बँकेच्या नाविन्यपूर्ण योजनेची माहिती सर्वांना दिली,
यावेळी ते म्हणाले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे बँकेची मोठी प्रगती झालेली आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही.
