Rohit Pawar : सिडको जमीन घोटाळ्याबाबत रोहित पवारांचा सरकारवर निशाणा; म्हणाले

५ हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर केला होता. यावर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिरसाठांवर गंभीर आरोप केले होते.

सिडकोचे अध्यक्ष असताना शिरसाट यांनी मुंबईतील बिवलकर यांना सुमारे १५० एकर जमीन दिली आणि यामध्ये ५ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि संजय शिरसाट यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी “असे आरोप रोज केले जातात, त्यामुळे पुरावे द्या,” असे म्हणत रोहित पवार यांनाच आव्हान दिले होते. त्यामुळे आता रोहित पवार यांनी सोमवारी दि. २५ रोजी पत्रकार परिषद घेत तब्बल १२ हजार पानांचे बॅग भरून पुरावे सादर केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत पुन्हा एकदा एक ट्विट पोस्ट केल आहे.