रस्ता अडवल्यास थेट ३५३ नुसार गुन्हे दाखल करा, त्यांना उचला ” – उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमक

Share

पुणे -: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा दौरा करत आहेत. हिंजवडीमध्ये अनेक विकास काम सुरू आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ता करण्यात येत आहे.

विप्रो कंपनीच्या शेजारी रस्त्यावरून अजित पवारांनी थेट रस्ता अडवणाऱ्याला इशारा दिला आहे.

रस्ता अडवणाऱ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ३५३ कलमानुसार गुन्हे दाखल करा, त्यांना उचला. असा आदेश अजित पवारांनी पोलीस प्रशासनाला दिला. ज्या व्यक्तींची जागा आहे. त्या व्यक्तींना योग्य मोबदला दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. हिंजवडीमध्ये अनेक ठिकाणी मेट्रो आणि पीएमआरडीच ढिसाळ नियोजन पाहण्यास मिळालं.

क्रोमा चौक येथे मेट्रो स्टेशनचा सरकता जिना चुकीच्या पद्धतीने उभारल्याचं अजित पवारांना काही जणांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी योग्य ती उपाययोजना करून वाहतूक कोंडी होणार नाही. यासाठी उपाय योजना करण्याचे पीएमआरडी आणि मेट्रो प्रशासनाला सांगितलं. त्या चौकातून दररोज लाखो आयटी अभियंते नोकरीला जातात.

पहाटेच उतरले रस्त्यावर, पुण्यातील आयटी पार्कमध्ये जाऊन दिले असे आदेश

पुणे शहर आयटी सिटी म्हणून ओळखले जाऊ लागले. आयटी सिटीमधील हिंजवडी भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दहा मिनिटांचा पावसात हा भाग वॉटर पार्क होत आहे.

त्यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. त्यामुळे रविवारी पहाटेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रस्त्यावर उतरले. ते थेट हिंजवडीत पोहचले. त्या भागातील समस्या जाणून घेतल्या. तसेच उपाययोजना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *